क्राईमनामा Live : शिक्षकांनी अनुभवले हसत-खेळत विज्ञानाचे प्रयोग अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या वतीने ऑल स्टेट कंपनी यांच्या सहकार्याने ...
क्राईमनामा Live : शिक्षकांनी अनुभवले हसत-खेळत विज्ञानाचे प्रयोग
अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या वतीने ऑल स्टेट कंपनी यांच्या सहकार्याने "बनवा स्वतःची प्रयोगशाळा (मेक युवर ओन लॅब)" या विज्ञान शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागा च्या गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन चे महाराष्ट्र संघ प्रमुख रमेश हिटनल्ली,समन्वयक राजेंद्र औटी,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल,उपाध्यक्ष यशवंत दाते,जुन्नर तालुका गणित संघांचे अध्यक्ष प्रवीण ताजने,केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष जाधव सर,पंचायत समिती विषय तज्ज्ञ सचिन गुंजाळ,केंद्र प्रमुख तितर मॅडम तसेच जुन्नर तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन हि एक धर्मदाय शैक्षणिक संस्था असून आर्थिक दृष्ट्या वंचित मुलांसाठी जगातील सर्वात मोठा मोबाईल हँड्स ऑन विज्ञान शिक्षण कार्यक्रम चालवते.अगस्त्या शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश शिक्षकांना प्रेरित करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा,सर्जनशिलता आणि आत्मविश्वास वाढवणे हा असून हँडस ऑन प्रयोगाद्वारे शिकण्यासाठी चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन चे महाराष्ट्र संघ प्रमुख रमेश हिटनल्ली यांनी सांगितले.
गट शिक्षणाधिकारी संचिता अभंग मॅडम उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि,करियर च्या दृष्टीने इंग्रजी,गणिता बरोबरच विज्ञान विषय महत्वाचा आहे.या शिबिरामध्ये प्रयोगा द्वारे मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मदत होईल.तसेच विद्यार्थ्यांना क्लिष्ट किंवा अवघड वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवल्या आहेत.विज्ञानाचे अभिनव आणि वैविद्यपूर्ण उपक्रम या शैक्षणिक संकुला मध्ये सतत राबविले जातात याचा फायदा जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तर होतोच परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील होतो.
विज्ञानातील प्रयोगाची आवड निर्माण होण्यासाठी अशा प्रकारची शिबीरे महत्वाची असल्याचे गट शिक्षणाधिकारी संचिता अभंग म्हणाल्या.अत्यंत कमी कालावधीमध्ये या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समर्थ संकुलाचे यावेळी गट शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमासाठी ८ ते १० डिसेंबर २०२२ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ३५ विद्यालयातील विज्ञान शिक्षकांनी सहभाग नोंदवला.बंगलोर येथून आलेल्या व्यंकटेश व जय प्रकाश यांनी सहभागी शिक्षकांना प्रशिक्षण दिले.अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन कडून प्रत्येक विज्ञान शिक्षकास विज्ञान पेटी प्रदान करण्यात आली.ज्यामध्ये ५० प्रयोग करता येतील एवढ्या साहित्याचा समावेश होता.या उपक्रमास पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सर्व उपस्थित विज्ञान शिक्षकांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघांचे प्रवक्ते महेंद्र गणपुले व जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष तबाजी वागदरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.
COMMENTS