सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कें...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्रस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल ता.जुन्नर जिल्हा पुणे येथे आनंदात व उत्साहात आणि एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. पुष्पलता पानसरे केंद्रप्रमुख उच्छिल कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अपंग समावेशित शिक्षण पंचायत समिती शिक्षण विभागाचे मा.श्री.तोरकडी सर व श्रीम. रोहिणी गडदे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच नंदनवन संस्थेचे संस्थापक व सचिव श्री विकास घोगरे व सौं अश्विनी घोगरे यांनीही सर्वच आपल्या त्यांच्या दिव्यांग मुला बरोबरच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आणि उपस्थित दिव्यांग मुलांना मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्वसामान्य जनतेत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रति सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरित करावे. तसेच त्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अन्वर सय्यद यांनी स्वागत केले या वेळी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागाचे विशेष शिक्षक तोरकडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्छिल गावातील सुरेखाताई नवले व दिपक ससाणे यांचाही उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर श्रीम रोहिणी गडदे विशेष शिक्षक यांनी समता दिवस स्पर्धां विषयी माहिती मार्गदर्शन केले, तर श्री सुभाष मोहरे यांनी सुत्रसंचालन व स्पर्धा नियोजन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, दिव्यांग व्यक्ती व बालचमू उपस्थित होते. सदर कार्यक्रमानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या लिंबु चमचा, रंगभरण, वेशभूषा, चेंडू फेक वक्तृत्व स्पर्धा व गायन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शालेय वस्तू बक्षिस देऊन त्यांचा गुणगौरव उच्छिल शाळेच्या सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आले होते. नंदनवन संस्थेचे विकास घोगरे यांनी आंबोली येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे आणि ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले यानंतर सर्व दिव्यांग मुलांनी दाऱ्याघाटाचा आनंद घेतला तसेच सुभाष मोहरे विश्वस्त नंदनवन यांनी सर्व दिव्यांग बांधवांना स्नेहभोजनाचा आनंद आंबोली येथे दिला. केंद्रस्तरीय सर्व दिव्यांग गुणवान विद्यार्थी व स्पर्धा पुढीलप्रमाणे
१) गायन स्पर्धा प्रथम क्रमांक कु. श्रेया रविंद्र भालेराव उच्छिल द्वितीय क्रमांक धनश्री दाते आंबोली तृतीय क्रमांक जयदिप भालचिम आंबोली
२)वक्तृत्व स्पर्धा प्रथम प्रेम नवले कालदरे द्वितीय शुभम मेमाणे भिवाडे तृतीय यश मोहरे आंबोली
३) वेशभूषा स्पर्धा प्रथम निलम केंगले उच्छिल द्वितीय धनश्री दाते व तृतीय रोहित मोहरे आंबोली ४) चेंडू फेक स्पर्धा प्रथम प्रेम मोहरे आंबोली द्वितीय मयूर चौरे शिवली तृतीय निलम केंगले उच्छिल
५) चित्रकला स्पर्धा प्रथम जयदिप भालचिम व द्वितीय धनश्री दाते व तृतीय क्रमांक श्रेया भालेराव उच्छिल ६) चमचा लिंबू स्पर्धा प्रथम क्रमांक मयूर चौरे शिवली द्वितीय धनश्री दाते आंबोली व तृतीय क्रमांक स्वरा पांडे धालेवाडी या सर्व विजयी स्पधकांना उच्छिल शाळेच्या वतीने सर्व दिव्यांग मुलांना छान जेवन व गोड खाऊ आणि गुलाबपुष्पे देण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भिवाडे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कडू शिवली शाळेचे मुख्याध्यापक श्री तुकाराम भालेकर धालेवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विठल जोशी कालदरे शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक विरणक तसेच आंबोली शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक पतसंस्थेच्या नूतन संचालिका सौ पूनम तांबे आडी शिक्षक उपस्थित होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेतील सौं स्मिता ढोबळे व सौ लिलावती नांगरे आणि सौ आरती मोहरे या सर्वच शिक्षकांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन केले.
COMMENTS