वाशिम: समृद्धी महामार्गावर मोटारीला झालेल्या भीषण अपघातात दोन जणींचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ...
वाशिम: समृद्धी महामार्गावर मोटारीला झालेल्या भीषण अपघातात दोन जणींचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलीचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ हा झाला असून, अपघातग्रस्त नागपूर येथील आहेत. अपघातामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात असताना वाशिमच्या कारंजाजवळ मोटारीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज (बुधवार) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान घडली. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, मुलगी कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली 200 फूट अंतरावर जाऊन पडली होती.
अपघाताच्या आवाजाने स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य सुरू केले. अपघात अत्यंत भीषण असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चारजण उपस्थित होते. त्यापैकी दोनजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर येत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
COMMENTS