सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, परमपुज्य महामानव डॉ. बाबासाह...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, परमपुज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना ठाणे येथील अंबरनाथ विधानसभेचे आमदार सन्मा. डॉ. बालाजी किणीकर व जुन्नर तालुक्यातील केळी माणकेश्वर गावच्या सौ.समिधाताई अदिनाथ कोरडे मा. नगरसेविका तथा उपशहर संघटक उल्हासनगर यांच्या सौजन्याने वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. किरण म्हसकर महसुल विभाग जुन्नर तथा गाईड पयर्टक मार्गदर्शक व संपादक गजर सह्याद्री यांच्या विशेष प्रयत्नातून आदिवासी भागातील मुलांना देण्यात आल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना यानिमित्ताने संदेशपर सांगितले आहे की, नियमित शाळेत जावे, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नेहमी खरे बोलावे .कचरा कुंडीतच टाकावा, झाडे लावा झाडे जगवा वडीलधाऱ्या व्यक्तींचा व गुरुजनांचा मान राखावा, सारे शिकूया पुढे जाऊया, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल , शिक्षणाला सहकार्य हेच आमचे ध्येय, ज्ञानवंद व्हा! गुणवंत व्हा! यशवंत व्हा! अशा गोड गोड शुभेच्छा. तसेच मा.नगरसेविका समिधाताई कोरडे यांचे आभार व्यक्त केले. या सर्व वह्यांच्या मुखपृष्ठांकनातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. अतिशय सुंदर व आकर्षक आणि सुरेख वह्या आज ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मिळाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. प्रतिमेचे पूजन सौं स्मिता ढोबळे सौ आरती मोहरे यांनी तर पुष्पहार सौ लिलावती नांगरे यांनी अर्पण केला तसेच महापुरुषाची माहिती व जीवनपट श्री.सुभाष मोहरे यांनी सांगितले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी मानले.
COMMENTS