सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : अष्टविनायक गणपतीपैकी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देव...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : अष्टविनायक गणपतीपैकी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी जितेंद्र चंद्रकांत बिडवई व सचिवपदी शंकर लक्ष्मण ताम्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे माजी अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे यांनी दिली.
जितेंद्र बिडवई हे यापूर्वी देवस्थानच्या सचिव पदावर कार्यरत होते. तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे सचिव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक,शिवकार्य अर्बन मल्टिपल निधी संस्थेचे चेअरमन म्हणूनही ते कार्यरत आहेत तसेच डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम ते राबवीत असतात. राज्य शासनाच्या वतीने त्यांना कृषिनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे.
तसेच शंकरराव ताम्हाणे देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असून गेले २३ वर्षे अध्यक्ष पदाचे व ६ वर्षे सचिव पदाचे काम पाहिले आहे. त्यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला.
रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी झालेल्या देवस्थानचे मासिक सभेत ही निवड करण्यात आली. देवस्थानच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मावळते अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, कैलास लोखंडे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, विजय वऱ्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे आणि कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्थित होते. निवडीनंतर देवस्थानच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध संस्थांच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला.
जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका जाहीर झालेला आहे त्यामुळे निसर्ग पर्यटनासोबतच धार्मिक पर्यटन वाढीसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे तसेच येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
COMMENTS