क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील कोळवाडी डिंगोरे हद्दीत सकाळी ७ च्या दरम्यान रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवले होते. दरम्यान हा ब...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील कोळवाडी डिंगोरे हद्दीत सकाळी ७ च्या दरम्यान रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवले होते.
दरम्यान हा बिबट्या जखमी अवस्थेत बेशुध्द झाला होता, शुध्दीवर आल्यावर तो रस्ता पार करून एका वीटभट्टीच्या शेजारच्या दाट झुडपात जाऊन लपलेला असता, वीटभट्टीवरील एक कामगार शौचालयाकरीता गेला असताना त्याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये कामगार जखमी झाल्याने आरडाओरडा झाल्याने परिसरातून ग्रामस्थ आल्यानंतर हि घटना उघडकीस आली, कामगाराला तात्काळ दवाखान्यात नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान हि घटना डिंगोरे येथील बाबु कुमकर यांच्या शेतात घडली असल्याचा या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
या घटनेची माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व जखमी बिबट्याला पिंजर्यात जेरबंद करून माणिकडोह येथे नेण्यात आले.
COMMENTS