क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावची सार्वत्रिक सन २०२२ ते सन २०२७ ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. यामध्ये सकाळी ७...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावची सार्वत्रिक सन २०२२ ते सन २०२७ ही पंचवार्षिक निवडणूक अतिशय अटीतटीची झाली.
यामध्ये सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून वॉर्ड क्रमांक १, वॉर्ड क्रमांक २, वॉर्ड क्रमांक ३ यातील मतदारांनी मतदान केंद्र जि.प.प्राथमिक शाळा बोतार्डे येथे जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.
खरं तर बोतार्डे गावची निवडणूक हि अतिशय टोकाची ठरली.
मात्र यात बोतार्डे गावातील हनुमान ग्रामविकास आघाडी या पॅनल व परिवर्तन ग्रामविकास पॅनल या दोनही पॅनलमधील उमेदवारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला, विशेष म्हणजे तरूण, अपंग वयोवृद्ध तसेच ज्येष्ठ व्यक्तींचा यात हिरीरीचा सहभाग होता त्यांनीदेखील अापल्या मतदानाचा अधिकार बजावला.
->बातमी अपडेट होत आहे.
सायंकाळी ५ नंतर बातमी सविस्तर प्रसारीत केली जाईल.
COMMENTS