क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावची 2022 ची आगामी निवडणूक येत्या रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या निवडणूकीच...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील
बोतार्डे गावची 2022 ची आगामी निवडणूक येत्या रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार
आहे.
या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
गावच्या भविष्याचा जाहिरनामा अनिता गांगड वार्ड क्रमांक 3 च्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या
दावेदार यांनी मांडला. त्यांनी सांगितले की, गावच्या विकासाला मुख्यत प्राधान्य राहिल.
तळागाळातील लोकांच्या
समस्यांना नेटाने सामोरे जाऊन त्या समस्या सोडविणार असल्याचे आगामी लोकनियुक्त सरपंच
पदाचे उमेद्वार अनिता गांगड यांनी सांगितले.
गावातील सर्व जातीधर्मातील
लोकांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ व पारदर्शक स्वरूपाचा करणार असल्याचे
देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान आमलेवाडी येथील
ठाकरवस्तीचे नविन जागेत एक नविन वसाहत राबविणार आहे, व याचे कामदेखील सुरू आहे.
पाणी प्रश्न, दळणवळण,
रोजगाराच्या संधी, बेरोजगारीचा प्रश्न आगामी कालखंडात सोडविण्याचा मानस आहे, असे गांगड
यांनी सांगितले.
COMMENTS