क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बसेसच्या भाडेवाढीत दुप्पट वाढ करण्यात अाली आहे. दरम्यान हि भाडेवाढ शिवाजी महाराज पुतळा ...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बसेसच्या भाडेवाढीत दुप्पट वाढ करण्यात अाली आहे.
दरम्यान हि भाडेवाढ शिवाजी महाराज पुतळा ते वरसुबाई खिंड या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र दत्तमंदिर- कुसूर या मार्गावरून या बस जात आहेत, यामुळे या मार्गावरील एक स्टेजच्या बाजूचे दर किलोमीटर वाढल्याने केले आहेत.
या संबंधीची माहिती जुन्नर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक यांनी दिली.
मात्र या भागातील प्रवाशांना या तिकीट दराचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे, कारण अचानक झालेली दरवाढ आणि प्रवाशांच्या खिशाला बसणारी झळ यात फार मोठा ताण होत असल्याचे प्रवशांनी सांगितले.
मात्र हे रस्त्याचे काम जलद गतीने करावे तसेच भाडेवाढीमुळे प्रवाशांचा कल खाजगी वाहनांकडे थोड्याफार प्रमाणात होत असल्याचे देखील प्रवाशांनी सांगितले.
मात्र, अचानक झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता भाडेवाढ झाली त्यामुळे एक शंका उपस्थित होत आहे.
दरम्यान क्राईमनामा लाईवच्या मुख्य संपादकांनी जुन्नर आगार प्रमुखांना याबद्दलची विचारणा केल्यास त्यांनी सांगितले की,
( या रस्त्यावरील ज्या ज्या बसचे भाडेवाढ झाली आहे या संदर्भात किलोमीटर जास्त होत असल्याने हि भाडेवाढ केली असून वरिष्ठांचे तसे आदेश आहेत, मात्र जेव्हा रस्त्याचे काम होईल तेव्हा मात्र हि भाडेवाढ पूर्वीप्रमाणे असेल, त्यामुळे प्रवाशांना कुठलीही शंका नसावी.-जुन्नर आगार प्रमुख )
दरम्यान या मार्गावरील बसेसचे दर वाढलेत.
१.जुन्नर - दातखिळेवाडी.
२.जुन्नर - काटेडे.
३.जुन्नर - तांबे.
४.जुन्नर - भिवाडे.
५.जुन्नर - इंगळूण.
६.जुन्नर - हातवीज.
७.जुन्नर - सुकाळवेढे.
८.जुन्नर - आंबोली.
९.जुन्नर - कालदरे.
१०.जुन्नर - शिवली भिवाडे.
११.जुन्नर - कुकडेश्वर.
१२.जुन्नर - घाटघर.
१३.जुन्नर - अंजनावळे.
आगार व्यवस्थापक आदेशावरून.
COMMENTS