क्राईमनामा Live : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व विद्या प्रतिष्ठान, इंग्लिश मेडियम स्कूल,इंदापूर यांच्या संयुक्त विद...
क्राईमनामा Live : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व विद्या प्रतिष्ठान, इंग्लिश मेडियम स्कूल,इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा २०२२.२३ दिनांक ०७/१२/२०२२ रोजी १९ वर्षा खालील मुला-मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जिल्हयातून एकूण ०८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विद्या प्रतिष्ठान, इंग्लिश मेडियम स्कूल, इंदापूर संघास २-८ ने नमवून स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले. त्याच बरोबर मुलींच्या अतिशय चूरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात श्री शिवछत्रपती महाविद्यालयाने विद्या प्रतिष्ठान, इंग्लिश मेडियम स्कूल, इंदापूर संघास ४-३नमवून स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले.
सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.अँड संजय शिवाजीराव काळेसाहेब यांनी अभिनंदन केले. तसेच विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व अध्यक्षांचे प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.उजगरे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे व ज्युनिअर महाविद्यालय उपप्राचार्या श्रीमती पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा.एस ए.श्रीमंते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.ए.के.बढे व प्रा.एम.एस.बोंबले यांचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS