विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविद्या...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयस्तरीय "आविष्कार" स्पर्धेमध्ये एकूण 06 गटांमधील 17 संशोधन प्रकल्पांची निवड विभागस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यापैकी शास्त्र शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागातून एफवायबीएस्सी वर्गातील विद्यार्थीनी कुमारी झैनाब सय्यद हिने डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालय, आकुर्डी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय (झोनल लेव्हल) आविष्कार स्पर्धेमध्ये पदवी गटातून सादर केलेल्या "पर्यावरणपूरक पेपर निर्मिती" या संशोधन प्रकल्पाची निवड करण्यात आली. तसेच सदरचा संशोधन प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे होणाऱ्या "विद्यापीठस्तरीय आविष्कार" स्पर्धेमध्ये सादरीकरण करण्यासाठी पात्र ठरला आहे. कुमारी झैनाब सय्यदचा संशोधन प्रकल्प, महाविद्यालय व विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये पात्र ठरल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड. संजय शिवाजीराव काळे तसेच सर्व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, एआरसी प्रमुख डॉ. आर. डी. चौधरी, कार्यालय प्रबंधक सौ. एम. डी. कोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक व अभिनंदन करून विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या संशोधन प्रकल्पासाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनायक लोखंडे व त्यांचे सहकारी प्रा. सुधीर डोके यांनी मार्गदर्शन केले आहे.
COMMENTS