कल्याण : नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी सूरज ऊर्फ वीरेंद्र मिश्रा (वय ३२, रा. दिवा, मध्य प्रदेश) याला म...
कल्याण : नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी सूरज ऊर्फ वीरेंद्र मिश्रा (वय ३२, रा. दिवा, मध्य प्रदेश) याला महात्मा फुले पोलिसांनी अखेर १४ दिवसांनंतर अटक केली आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या आवारात १ डिसेंबर रोजी नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मिश्रा हा १ डिसेंबरच्या पहाटे बदलापूरहून गाडी पकडून कल्याण स्टेशन परिसरात आला होता. एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांच्या जवळ रस्त्यावर झोपल्याचे पाहून आरोपी मिश्राने मुलीला उचलून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयित मुलास ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर सोडून दिले होते.
मिश्रा याने कल्याणच्या भानुसागर चित्रपटगृह परिसरात २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात त्याची तुरुंगात रवानगी झाली होती. या प्रकरणातून तो अलीकडेच सुटून आला होता. आता त्याने अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. गुन्हा करून त्याने भिवंडी गाठली होती
अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास पथके नेमली होती. सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि हरिदास बोचरे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याने आरोपी गजाआड झाला आहे.
COMMENTS