पुणेः एका केसमध्ये मदत करण्यासाठी तब्बल दोन लाखाची लाच मागून दीड लाखाची रक्कम स्वीकारणाऱ्या जिल्हा न्यायालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक ...
पुणेः एका केसमध्ये मदत करण्यासाठी तब्बल दोन लाखाची लाच मागून दीड लाखाची रक्कम स्वीकारणाऱ्या जिल्हा न्यायालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या आहेत.
लाचप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अशोक देठे (वय 39, रा. राजगुरू नगर , खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्यानुसार, तक्रारदाराच्या मावस भावाची केस शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय सुरू आहे. तेथे देठे हा वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. फिर्यादीच्या भावाला केसमध्ये सुटण्यासाठी मदत करण्यासाठी देठे हा त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी करत होता. तडजोडी अंती दीड लाख देण्याचे ठरल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील एका झेरॉक्स समोर देठेला दीड लाखाची लाच स्वीकारताना रात्री सव्वा आठ वाजता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे.
COMMENTS