क्राईमनामा Live : शालेय शिक्षण क्रीडा विभाग,क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी ...
क्राईमनामा Live : शालेय शिक्षण क्रीडा विभाग,क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे व जुन्नर तालुका क्रिडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय शालेय खो खो स्पर्धा २०२२ नुकतीच बेल्हे येथील समर्थ क्रीडा संकुलात पार पडली.
जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांच्या शुभ हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला. दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे क्रीडा मार्गदर्शक एच पी नरसुडे सर, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश राऊत सर म्हणाले की, शरीर संपदा हीच खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी व्यायाम कसरत आणि मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. तालुका, जिल्हा, विभागस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये अधिकचे गुण मिळतात व ते ग्राह्य धरले जातात.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
१९ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.-गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
द्वितीय क्र.-समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे
१९ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
द्वितीय क्र.-समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे
१७ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.-गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
द्वितीय क्र.-ज्ञानमंदिर हायस्कुल,आळे
१७ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-महात्मा फुले विद्यालय,खोडद ता.जुन्नर
१४ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.-जि. प. गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-ज्ञानमंदिर हायस्कुल,आळे
१४ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-जि. प. गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-समर्थ गुरुकुल,बेल्हे
बक्षीस वितरण समारंभ प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक प्रा.किरण वाघ, डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.नवनाथ निर्मल, प्रा.ज्ञानेश्वर जाधव सर तसेच गुरुकुल च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS