क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानक हे मागील कित्येक दिवसांपासून अस्वच्छतेच्या साम्राज्यात असलेले पह...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानक हे मागील कित्येक दिवसांपासून अस्वच्छतेच्या साम्राज्यात असलेले पहावयास मिळत आहे, जुन्नर बस स्थानकात पुणे, ठाणे, नारायणगाव, मुंबई, औरंगाबाद, अकोले, घोडेगाव, पंढरपूर, बारामती व विविध ठिकाणावरून प्रवासी येत जात असतात. जुन्नर तालुका हा पर्यटन द्रृष्ट्या संपन्न तालुका असून या ठिकाणी महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक येत जात असतात, त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणच्या घाणीच्या व दुर्गंधीच्या वासामुळे व डासांमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
बस स्थानकातील शौचालयांत पाणी नसल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे, मात्र या गोष्टकडे बस स्थानक प्रशासन व नगरपरिषद जुन्नर स्वच्छता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे, या ठिकाणच्या परिसरात मोठमोठी झाडे व गवत तसेच सांडपाणी इतरत्र वाहून बस स्थानकात येणारे जाणारे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
COMMENTS