पाटणा (बिहार): एक अनियंत्रित ट्रकने अनेक लोकांना चिरडले असून, यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. ...
पाटणा (बिहार): एक अनियंत्रित ट्रकने अनेक लोकांना चिरडले असून, यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. यावेळी नागरिकांनी केलेला मदतीसाठीचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.
जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
वैशाली जिल्ह्यातील महनार-हाजीपूर मुख्य मार्गावर हा अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्य़ात आले आहे. महनार मोहद्दीनगर एसएचवरील ब्रह्मस्थानाजवळ नागरिक भुइयां बाबाची पूजा करत होते. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्यांना ट्रकने चिरडले. यामध्ये१५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला आहे. चालक ट्रकमध्येच अडकला होता. शिवाय, ट्रकच्या केबिनमध्ये देखील काहीजण अडकले आहेत. अपघातानंतर अटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. ट्रक चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. सुलतानपूर 28 टोला येथून नागरिक लग्नाचं जेवण जेऊन परतत होते. त्यावेळी एक भरधाव ट्रक समोरुन आला आणि त्याने लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. यावेळी नागरिकांनी केलेला मदतीसाठीचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता. भीषण अपघातात 8 जणांचा जागीच जीव गेला. तर कित्येक जण जखमी झाले. मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले आहे.
COMMENTS