लखनौ (उत्तर प्रदेश): यमुना एक्स्प्रेस वेवरील सर्व्हिस रोडवर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा उलगडा करण्यात पोलिस...
लखनौ (उत्तर प्रदेश): यमुना एक्स्प्रेस वेवरील सर्व्हिस रोडवर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह दिल्लीतील आयुषी यादव या युवतीचा असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
युवतीच्या आई आणि भावाने मृतदेहाची ओळख पटवली आहे. ऑनर किलिंगचा प्रकार असून, हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांनी समोर आणलेले पैलू हादरवणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषीचे कुणाशी लग्न करायचं, यावरन बापलेकीमध्ये खटके उडाले होते. 17 नोव्हेंबर रोजी जेव्हा आयुषी लग्न करुनच घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचलले आणि पोटच्या पोरीचीच हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आयुषीच्या आईनेही या हत्याकांडात वडिलांना साथ दिली आहे. आयुषीच्या आईने तिची हत्या केली नसली, तर हत्येनंतर आयुषीच्या वडिलांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केली आहे. आयुषीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन तो यमुना एक्स्प्रेस वे येथे एका ठिकाणी बॅगेत टाकून देण्यात आला होता.
18 नोव्हेंबर रोजी रक्ताने माखलेल्या एका ट्रॉली बॅगेत आयुषीचा मृतदेह आढळून आलेला होता. हा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणी केली. त्यानंतर आयुषीच्या घरचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला. त्यावेळी तिचे वडील फरार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आयुषीची आई आणि भाऊ यांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली. आयुषीच्या वडिलांनाही पोलिसांनी शोधून काढलं. पोलिसांच्या चौकशीत वडिलांनीही आयुषीची हत्या केल्याची कबुली दिली.
घरातल्यांसमोरच वाद झाल्यानंतर वडिलांनी आयुषीला गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर तिच्या मृतदेह वडिलांनी आईच्या मदतीने ट्रॉली बॅगमध्ये भरला होता, असे समोर आले आहे. गेले काही दिवस आयुषी घरातून बेपत्ता होती. पण कुणीही तिच्या बेपत्ता असण्याबद्दल तक्रार न दिल्यानं पोलिसांना हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं असल्याचा अंदाज आला होता. सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया, सीडीआर या सगळ्याच्या मदतीने पोलिसांनी कसून तपास करत आता आरुषीची आई आणि वडील दोघांनाही अटक केली आहे. त्यांची सध्या अधिक कसून चौकशी केली जात आहे.
नितेश यादव हे कामानिमित्त दिल्लीतील एका गावात राहण्यासाठी आले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. पत्नी-पत्नी आणि दोन मुले. मात्र मुलीने आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न न करता स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडल्यानंतर नितेश यादव यांनी हे धक्कादायक कृत्य केले आहे. यादव कुटुंब हे मूळचा उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील आहे.
COMMENTS