कोल्हापूर: वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडील शौचालयात गेले असता मुलाने बाहेरुन कडी लावली आणि ...
कोल्हापूर: वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडील शौचालयात गेले असता मुलाने बाहेरुन कडी लावली आणि त्यांना रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार कागल तालुक्यात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली.
या घटनेत वडील गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
व्हन्नूर गावात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. देवबा हजारे हे शौचासाठी गेले होते. त्यावेळी बाहेरुन कडी लावून घेत त्यांच्या मुलाने आत रॉकेल टाकलं आणि त्यांना पेटवून दिले. मुलगा शिवाजी हजारे आणि शिवाजीची पत्नी सरला हजारे यांनी मिळून हा हत्येचा कट रचला होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून देवबा हजारे अगदी थोडक्यात बचावले आहेत. गंभीर जखमी झालेल्या देवबा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वाटणीवरुन वडील देवबा हजारे यांच्यासोबत मुलगा शिवाजी हजारे यांच्यात वाद सुरु होता. या वादातूनच मुलाने वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आता सखौल चौकशी केली जाते आहे. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर ही धक्कादायक घटना घडली. प्रॉपर्टीत वाटणी देत नाहीस काय, तुला जिवंत जाळतो, असे म्हणत देवबा यांच्यावर त्यांचा मुलगा शिविगाळ करु लागला. त्यानंतर त्याने पेट्रोल सारखा ज्वलनशील पार्थ टाकून आग लावली आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवबा हजारे यांनी केला आहे.
COMMENTS