सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live :
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन व समर्थ
रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी)
यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ क्रीडा संकुलामध्ये नुकतेच कबड्डी स्पर्धांचे
आयोजन करण्यात आलेले होते.
सदर क्रीडा स्पर्धेचे उदघाटन मंदार जावळे (उपविभागीय पोलीस अधिकारी
जुन्नर) यांच्या शुभ हस्ते व आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद
क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
मंदार जावळे साहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, शरीर
हीच खरी संपदा आहे. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, कसरत, योगा करून मैदानी खेळांना प्राधान्य
द्यावे. कबड्डी या खेळामध्ये शारीरिक क्षमता वाढते. त्याचबरोबर बुद्धीचातुर्य, नेतृत्व
गुण आणि सांघिक भावना वाढून मन आणि बुद्धी यांचा विकास होतो.
विभागीय स्तरावर झालेल्या या स्पर्धामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ संघ
सहभागी झाले होते.
समर्थ पॉलिटेक्निक या संघाने उत्कृष्ट खेळ करत पहिली उपांत्य फेरी
गाठली. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये मात्र समर्थ आणि अवसरी या दोघांमध्ये अवसरी
पॉलिटेक्निक विजयी ठरले तर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेल्या झील
पॉलिटेक्निक आणि पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक यांच्यामध्ये झील पॉलिटेक्निक विजयी
ठरले.
अंतिम सामना शासकीय तंत्रनिकेतन अवसरी व झील पॉलिटेक्निक
यांच्यामध्ये चुरशीचा आणि रंगतदार ठरला.यामध्ये अवसरी संघाने रोमहर्षक विजय मिळवत
विजयश्री खेचून आणली.
बक्षीस वितरण समारंभ आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद
क्षिरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन
करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष
माऊलीशेठ शेळके, सचिव
विवेक शेळके, विश्वस्त
वल्लभ शेळके, प्राचार्य
अनिल कपिले यांनी हार्दिक अभिनंदन केले. सदर स्पर्धेच्या नियोजनामध्ये प्रा.एच पी
नरसुडे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.
संजय कंधारे, प्रा.नंदकिशोर
मुऱ्हेकर, प्रा.ज्ञानेश्वर
जाधव, प्रा.किरण
वाघ, प्रा.निर्मल
सर यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS