क्राईमनामा Live : आज ७३ वा भारतीय संविधान दिन या दिनाचे औचित्य साधून बोतार्डे येथील ( नालंदा बुध्दविहार ) येथे संविधान दिन साध्या पध्दतीने स...
क्राईमनामा Live : आज ७३ वा भारतीय संविधान दिन या दिनाचे औचित्य साधून बोतार्डे येथील ( नालंदा बुध्दविहार ) येथे संविधान दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
बोतार्डे गावची आगामी निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने साध्या पध्दतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संविधान पूजन करून संविधान प्रस्तावनेचे वाचन करून भिमस्तुती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती लावून साध्या पध्दतीने हा कार्यक्रम साजरा केला. यावेळी बौध्द विकास मंडळाचे खजिनदार बाळू खरात, सहसेक्रेटरी सतिश शिंदे, सदस्य वैभव खरात, प्रतिक खरात, विजय पोटे, राजेंद्र मरभळ यांनी संविधान प्रस्तावनेचे वाचन केले.
COMMENTS