नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण भागातील पालममध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील मुलानेच मं...
नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण भागातील पालममध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील मुलानेच मंगळवारी (ता. २२) रात्री आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राज नगर पार्ट-2 भागात असलेल्या एका घरात चार मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चाकूने भोसकून या हत्या करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेले मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असन, मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुलाने चाकूने भोसकून चार जणांचा खून केला आहे. मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला होता. तो नुकताच व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन घरी परतला होता. पण घरी कुणाशीच त्याचं पटत नव्हते. घरात झालेल्या वादातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केले असण्याची शक्यता आहे. चार जणांचा जीव घेतल्यानंतर मारेकरी मुलगा कुठेही पळून गेला नाही. तो मृतदेहांशेजारीच बसून होता. माथेफिरु मुलाची अधिक चौकशी सुरू आहे.'
COMMENTS