पुणेः मटणाच्या सूपमध्ये भात आल्याने दोघांनी वेटरची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मंगेश पोस्ते (वय १९) असे मृत्युमुखी पड...
पुणेः मटणाच्या सूपमध्ये भात आल्याने दोघांनी वेटरची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मंगेश पोस्ते (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या वेटरचे नाव आहे तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावे आहेत.
याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली असून, संबंधित घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलिस या तिघांचा शोध घेत आहेत. सासुरवाडी हॉटेलमध्ये विजय वाघेरे आणि त्याचे साथीदार जेवायला आले होते. हॉटेलमध्ये आल्यापासून त्यांची तक्रार सुरू होती. मटण सूपमध्ये चुकून भात आला. त्यानंतर विजय आणि साथीदार चिडले.
विजयने वेटर मंगेशसह अजित आणि सचिनला शिविगाळ आणि दमदाटी सुरू केली. विजयच्या साथीदाराने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने या तिघांना मारहाण सुरू केली. त्यांचा जास्त राग हा मंगेशवर होता, म्हणूनच मंगेशला उद्देशून त्यांनी अपशब्द काढले. तुला मस्ती आलीय, तर आज तुला संपवतो, असे ओरडत त्याने मंगेशच्या थेट डोक्यातच दांडक्याने प्रहार केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी मंगेशला लगतच्याच खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अजित आणि सचिनवर उपचार सुरू आहेत.
सांगवी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी विजय आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS