जो धपूर (राजस्थान): दोघा जणांनी हॉटेलच्या काउंटरवर जाऊन आमची मैत्रीण रूममध्ये झोपली आहे , तिला डिस्टर्ब करू नका असा निरोप दिला. मात्र हॉ...
जोधपूर
(राजस्थान): दोघा जणांनी हॉटेलच्या काउंटरवर जाऊन आमची मैत्रीण रूममध्ये
झोपली आहे, तिला डिस्टर्ब करू नका असा निरोप दिला.
मात्र हॉटेलचा रूम उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
सुमन
वैष्णोई असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती.
दोन दिवसांपासून तिच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यामुळे घरच्यांनी हरवल्याची
तक्रार दाखल केली होती. पावटा येथील एका हॉटेलच्या रूमचा दरवाजा दोन दिवसांपासून
बंद असल्याचे उघडकीस आले. पोलिसांदेखत रूमचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा बेपत्ता सुमन ही त्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत
सापडली.
पोलिसांनी
सुमनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अधिक तपासादरम्यान
हॉटेलच्या रूममधून दोन युवक दोन दिवसांपूर्वी येऊन गेले होते अशी माहिती पुढे आली.
त्या आधारे पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या
पंचनामानुसार युवतीने आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, हॉटेलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या
जबाबवरून युवतीच्या मृत्यूमागे त्या दोन युवकांचा हात आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS