सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2022-2023 मोठ्य...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2022-2023 मोठ्या उत्साहात कोविड नंतर झाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. आज 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून स्पर्धेचे उद्घाटन श्री बापूनाना नवले संचालक उच्छिल सोसायटी यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेच्या निमित्ताने केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक आणि सर्व स्पर्धक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आणि शुभेच्छा केंद्राचे प्रभारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी तर चला गुरुसी वंदू सकाळ समूहाच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त श्री सुभाष मोहरे आणि नूतन संचालिका सौ. पूनम तांबे यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंच म्हणून केंद्रातील सर्व शिक्षकांनी परीक्षण केले. स्पर्धेची माहिती व नियोजन सांगताना सुभाष मोहरे यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाने यावर्षी प्रथम सत्रात होणाऱ्या या सर्व स्पर्धांच्या वेळापत्रकात पावसाच्या वातावरणामुळे मुलांना सहभागी होता यावे आणि आधिकाधिक सराव करता यावा यासाठी मागील परिपत्रकात अंशतः बदल करावा असा पाठपुरावा अखिल जिल्हा शिक्षक संघाने केल्याने या सर्वच जिल्ह्यातील स्पर्धा शाळा सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात घेण्याबाबतचे नियोजन शिक्षण विभागाने केले असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये लहान गटासाठी खो-खो या खेळाचा समावेश केला असून स्पर्धा वेळेत पारदर्शक व आनंदमय वातावरणात पार पाडल्या तसेच स्पर्धेसाठी विशेष सहकार्य प्रमाणपत्र श्री रामदास आढारी सामाजिक कार्यकर्ते व सर्व विजयी मुलांना वही पेन व पेन्सिल शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शरद नवले यांनी आणि सर्वांना जेवण चहापाणी तसेच सत्कार नियोजन शिक्षकवृंद उच्छिल यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी नियोजन सौ आरती मोहरे सौ लिलावती नांगरे व सौ स्मिता ढोबळे यांनी केले.
COMMENTS