मुख्य संपादक- प्रा. सतिश शिंदे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावचे रहिवासी माजी सरपंच गहिनाजी लक्ष्मण तलां...
मुख्य संपादक- प्रा. सतिश शिंदे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावचे रहिवासी
माजी सरपंच गहिनाजी लक्ष्मण तलांडे यांना श्री. शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठाण मुंबई
यांच्या वतीने राज्यस्तरीय सेवा कार्यसन्मान देण्यात आला.
तलांडे हे बोतार्डे गावचे माजी सरपंच होते, ते 1983 ते 1993
या कालखंडात त्यांनी बोतार्डे गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळली, ग्रामपंचायतीच्या
माध्यमातून विविध योजना त्यांनी राबविल्या. यामध्ये बोतार्डे गावात त्यांच्या कालखंडात
1991 ते 92 या कालावधीत त्यांनी पाण्याची टाकी, रस्ते, तसेच सर्वसामान्यांच्या अडचणींना
सोडविण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांनी एकसंघ ठेवण्याचे काम
तलांडे यांनी केले.
आम्ही त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की, हा
जो पुरस्कार मला मिळालेला आहे तो माझा एकट्याचा नव्हे तर यात माझ्या गावचा अभिमान
आहे, तसेच जुन्नर तालुक्यातील बोतार्डे या छोट्या गावातील एका सामान्य कुटुंबातील
व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला असून मला याचा सार्थ अभिमान आहे.
त्यांनी सांगितले की, आमच्या गावचे उपसरपंच उत्तम घुले,
सरपंच मच्छिंद्र केदार व सहकारी मित्रांचे मला नेहमी राजकीय व विविध सामाजिक गोष्टीत
सहकार्य असते.
तलांडे यांनी आमच्या गावाला स्मशानभूमी नव्हती त्यामुळे
तालुक्यात आमची कुचंबणा व्हायची मात्र आम्ही सर्वांनी मिळून याचा पाठपुरावा करून स्मशानभूमी
मंजूर करून घेतली.
रस्ते, पाणी, दळणवळण, सामाजिक सलोखा राखण्याचे काम हे गाव
करत असून गावाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे.
त्यामुळेच वास्तविक हा माझा सन्मान तर आहेच परंतु माझ्या
गावाचा व गावातील प्रत्येकाचाच सन्मान यामुळे वाढला आहे. याचा मला अभिमान असल्याचे
तलांडे यांनी सांगितले.
या सन्मानाचे खरे श्रेय मी माझे पुतणे तुकाराम तलांडे व
माझे बंधू अर्जुन तलांडे यांना देतो. असेदेखील ते यावेळी म्हणाले.
COMMENTS