अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील एका सरपंचाने प्रेमप्रकरणातून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विष घेतले आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा स...
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील एका सरपंचाने प्रेमप्रकरणातून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विष घेतले आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावात निवडणुका झाल्यानंतर अविनाश चव्हाण हा या गावचा सरपंच झाला.
त्यानंतर त्याच गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले. या प्रकरणाची गावात कुणकुण लागल्यानंतर विवाहितेच्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी याला विरोध केला. यानंतर संबंधित महिलेला पतीने माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार महिलेने सरपंच भोसले यांच्याकडे केली.
सरपंच अविनाश भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्ह्याधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले, 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला सोबत राहू देत नाही.' यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
COMMENTS