बीड : घरातल्या एकुलत्या एका मुलाचा लग्नापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धीरज तट (वय २...
बीड : घरातल्या एकुलत्या एका मुलाचा लग्नापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धीरज तट (वय २६, रा. अंबाजोगाई) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
धीरजच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
धीरज हा इंजिनिअर होता. शिक्षण झाल्यानंतर तो पुण्यात नोकरी करत होता. त्याचा साखरपुडा झाला होता. 18 डिसेंबर रोजी लग्न होणार असल्यामुळे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. कुटुंबात लगबग सुरु असताना धीरजचा अकाली मृत्यू झाला आहे.
धीरजला बुधवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्क बसला आणि तो जागीच कोसळला. कुटुंबीय डॉक्टरकडे घेऊन गेले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एकुलता एक मुलगा ऐन तारुण्यात गमावल्याने त्याच्या आईवडिलांसह नातलगांना मोठा धक्का बसला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. धीरज तट या तरुणाच्या मृत्यूमुळे आता हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS