क्राईमनामा Live : सुजन फौंडेशन संस्थेच्या वतीचे जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर स्वातंत्र्याचा अम्रृत महोत्...
क्राईमनामा Live : सुजन फौंडेशन संस्थेच्या वतीचे जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर स्वातंत्र्याचा अम्रृत महोत्सव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी लोक क्रांती सेनेच्या प्रदेश संघटक सौ.मंगलताई शेवकरी यांना गड शिवनेरी किल्ल्यावर पुरस्कार प्रदान झाला. सौ.मंगलताई शेवकरी ह्यानी समाजासाठी खुप कामे केली आहेत. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार ओबीसी जिल्हा अध्यक्षा काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा, दक्षता कमिटि सदस्या महाराष्ट्र माळी महासंघ उपाध्यक्षा अशी अनेक पदे भुषवली आहेत. खेड तालुक्यातील खंबीर महिला म्हणून सौ.मंगलताई यांची ओळख आहे. या कार्यक्रमा साठी महाराष्ट्रातुन कार्यक्रते शिव प्रेमी उपस्थित होते. सुजन फौंडेशन संस्थापक अजित जाधव, ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक संपत जाधव, कैलास जेजुरकर, मयूर दैऊडकर, दिपाली शेवकरी, किर्ती शेवटी, संतोष वराडी, सौरभ खूळे, विश्वनाथ सेवेकरी आदि मान्यवर उपस्थित होते अशी माहिती लोक क्रांती सेनेच्या राष्ट्रीय नेत्या सौ.कांताताई पांढरे यांनी दिली.
COMMENTS