क्राईमनामा Live : कुकडेश्वर ( जुन्नर ) येथे सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेले दाम्पत्य विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना शनिवारी दुपारी ...
क्राईमनामा Live : कुकडेश्वर ( जुन्नर ) येथे सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेले दाम्पत्य विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
या घटनेत पती सागर बाळू दिवटे व पत्नी नाजूका दिवटे यांचा म्रृत्यू झाला.
नाजूका हि घराशेजारच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली असता नाजूकाचा पाय घसरून विहिरीत पडल्यानंतर तिला वाचविण्यासाठी सागरने विहिरीत उडी घेतली मात्र दोघांचाही यात मृत्यू झाल्याची चर्चा ग्रामस्थ व्यक्त करत असताना तेथे गुरे चारणार्या एका युवकाला दुपारी विहिरीकाठी गाणी सुरू असलेला मोबाईल व विहिरीत बादली पडल्याचे आढळले.
त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
सागर व नाजूका यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS