बीड : प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना कासारी (ता. धारूर ) गावात घडली आहे...
बीड : प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना कासारी (ता. धारूर ) गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली. साक्षी ज्ञानोबा कदम (वय 16)असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
कासारी गावात यात्रेसाठी परळी तालुक्यातील पाडोळी येथील वैष्णवी मनोहर काळे ही तिचे मामा ज्ञानोबा कदम यांच्या गावाकडे आली होती. ती मामाच्या गावाला गेल्याचे कळताच तिचा गावातील प्रियकर आकाश नागोराव तांबडे हा स्कॉर्पिओने कासारी गावात आला होता. वैष्णवी ही तिचे मामा ज्ञानोबा सोपान कदम यांच्याकडे यात्रेनंतरही थांबली होती.
वैष्णवी हिचा प्रियकर आकाश स्कॉर्पिओ घेऊन आला. आकाशला वैष्णवी घेऊन गावातून पळून जायचे होते. परंतु, त्यांच्याबरोबर साक्षी असल्याने ती दोघांचे प्रेमप्रकरण नातेवाइकांना सांगेल या भीतीने दोघांनी दुपारी साक्षीला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु साक्षी विरोध करत होती. शेवटी दोघांनी जोराचा धक्का देऊन विहिरीत ढकलून दिले. यानंतर वैष्णवी व तिचा प्रियकर आकाश हा स्कॉर्पिओने गावातून पसार झाले. या प्रकरणी दोघा विरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS