सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या वतीने समर्थ इन्स्टिट्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या वतीने समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बेल्हे (बांगरवाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाच्या आयोजनामध्ये रायगड, ठाणे, पालघर, पुणे, आणि अहमदनगर अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये जवळपास ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून पुणे विभागीय संघाची निवड करण्यात आली. पुणे विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये सर्मथ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल ५५ खेळाडूंची निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
निवड झालेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे-
खो-खो (मुले):
सोमनाथ नरसाळे, अभिषेक कोळी, अजय कालेकर, संकेत चौधरी, अनिकेत कणसे.
खो-खो (मुली):
अनुजा तट्टू, किशोरी शिंगोटे, मेघा वागदरे, प्रणाली घुले, अदिती शेळके, तृप्ती पवार, सृष्टी भुजबळ.
कबड्डी (मुले):
शुभम घोलप, रोशन कोंगले, नागेश रोहकले, तन्मय खोकराळे, निशांत पठाण.
कबड्डी (मुली):
अनुष्का वाळकुंडे, साक्षी काकडे, वैष्णवी डोंगरे.
व्हॉलीबॉल (मुले):
वैभव तापकीर, ओंकार ढोमसे, शुभम शेरकर, सिद्धेश शेळके, पियुष पोखरकर.
व्हॉलीबॉल (मुली):
अंकिता खेडकर, आकांक्षा देठे, मनस्वी ढोकळे.
बास्केटबॉल (मुले):
राहुल वाघमारे, अक्षय चौधरी, केतन कुंभारवार, प्रताप कुलत, आफताब इनामदार, अभिषेक माशेरे, मैत्रेय भटकर.
त्याचप्रमाणे अथलेटिक्स मध्ये २१ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा.राजीव सावंत सर, प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, डॉ.संतोष घुले यांनी हार्दिक अभिनंदन केले. सदर स्पर्धेच्या नियोजनामध्ये प्रा.एच पी नरसुडे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.ज्ञानेश्वर जाधव, प्रा.किरण वाघ, प्रा.निर्मल सर यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS