मंचर (पुणे): कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी धारदार कटरने विद्यार्थ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...
मंचर (पुणे): कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी धारदार कटरने विद्यार्थ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
अवसरी खुर्द ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज मध्ये प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गौतम आवारी (वय १९ रा. अवसरी खुर्द मूळ राहणार देवतोरणे बुद्रुक ता. खेड जि. पुणे) फोनवर बोलण्यासाठी सेमिनार हॉल मधून बाहेर आला. अचानक पाठीमागून प्रतीक मुकुंद भोर (रा. भोरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) आला व त्याने अचानक खांद्यावरती हात ठेवल्याने राहुल आवारी यांने मागे वळून पाहिले असता तेव्हा प्रतीक मुकुंद भोर याने मानेवर व पाठीवर, गळ्यावर कटरने वार केला. राहुल आवारी याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता उजव्या त्याच्या अंगठ्या जवळ वार होऊन गंभीर जखम झाला. नंतर प्रतीक भोर घटनास्थळावरून पळून गेला. ओंकार जाधव व शिवम पाचरणे यांनी जखमी राहुल आवारी ला मंचर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरने राहुल वरती उपचार केले असून पंधरा टाके पडले आहेत.
घटनेची माहिती कळताच मंचर पोलिस ठाण्याचे हवालदार राजेंद्र हिले, पोलिस हवालदार घोडे, पोलिस शिपाई अजित पवार यांनी घटनेची माहिती घेऊन राहुलचा जबाब नोंदवला आहे पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. मंचर पोलिस स्टेशन भाग ५ पुन्हा रजिस्टर नंबर ४२१/२०२२ भादवि कलम ३०७,३२४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
COMMENTS