भो पाळ (मध्य प्रदेश): विम्याची रक्कम मिळावी म्हणून एकाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जीव घेतला आणि कार पुलावरून नदीत कोसळल्याचे दर्...
भोपाळ (मध्य
प्रदेश): विम्याची रक्कम मिळावी म्हणून एकाने सात महिन्यांच्या गर्भवती
पत्नीचा जीव घेतला आणि कार पुलावरून नदीत कोसळल्याचे दर्शवत तिचा अपघातात मृत्यू
झाल्याचा कट रचला होता.
मध्य
प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात ही घटना घडली. दोन वर्षांआधी मध्य प्रदेश-राजस्थान
सीमेवरील चवळी नदीच्या पुलावरून कार कोसळण्याची घटना घडली होती. याची माहिती
मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सोयत तालुका पोलिसांनी नदीत कोसळलेली कार
बाहेर काढली. घटनास्थळी जखमी अवस्थेत एक व्यक्ती दिसली. त्याच्याकडे चौकशी केली
असता कारला अपघात झाला असून, कार
पुलावरून कोसळली. कारमध्ये आपली पत्नीही होती, ती नदीच्या
प्रवाहात वाहून गेल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते. तत्काळ
बचावकार्य हाती घेत शोध सुरू केला तेव्हा पुलापासून दोन किलोमीटरवर गर्भवतीचा
मृतदेह सापडला होता.
घटना
घडल्यानंतर पोलिसांचा पतीवरच संशय बळावला होता. तपासादरम्यान गर्भवती महिलेने
तिच्या मित्रासोबत केलेलं सोशल मीडियावरील चॅटिंग समोर आले. यात पती आपणाला
राजस्थानात घेऊन आला आहे आणि कधीही तो आपल्याला ठार मारू शकतो, अशी भीती तिने व्यक्त केली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली
तेव्हा आरोपी पतीवर विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट
झाले. आरोपीनं स्वत:च्या पित्याचा खून केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होता.
सोशल मीडिया चॅटच्या आधारावर तपास केल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला.
आरोपीने
गुन्हा केल्याचं मान्य केला आहे. पत्नीच्या नावावर मोठ्या रकमेचा विमा असल्याने ती
रक्कम बळकावण्यासाठी पत्नीला ठार केल्याचे त्याने पोलिसांना तपासादरम्यान
सांगितले. या प्रकरणात सुसनेर येथील अप्पर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.
त्यानुसार, आरोपी पतीला जन्मठेप आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
COMMENTS