सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर या पतसंस्थेची पंचवार्षिक...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित जुन्नर या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाली. शिक्षक संघ पॅनलने९९ वर्षांची ऐतिहासिक परंपरा कायम राखत १७ पैकी १५ जागा जिंकत मोठा विजय मिळविला अशी माहिती जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले यांनी दिली.
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांची एक अग्रगण्य पतसंस्था आहे.शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने शिक्षकांच्या आर्थिक हिताच्या अनेक योजना राबविलेल्या आहेत. निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधी पॅनलकडून अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले, परंतु शिक्षक संघ पॅनलवर विश्वास दाखवून सर्व सभासदांनी पुन्हा एकदा विजयाची माळ शिक्षक संघ पॅनलच्या उमेदवारांच्या गळयात घातली अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
शिक्षक संघ पॅनलने १५ – २ असा दणदणीत विजय मिळविला. शिक्षक संघ पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण गट –
(१) कणसे नानाभाऊ तात्याबा
(२) कुटे अनिल गोविंद
(३) गवारी ज्ञानदेव चिंतामण
(४) तांबे पूनम पद्माकर
(५) पाडेकर संतोष मनोहर
(६) मुळे सचिन गीताराम
(७) मोरे जितेंद्र बाळू
(८) लोहकरे दिलीप काळूराम
(९) वाजगे रविंद्र तानाजी
(१०) वामन अंबादास ज्ञानेश्वर
(११) शिंगोटे अविनाश श्रीपत
इतर मागास प्रवर्ग -
(१) लोखंडे विजय मुरलीधर(पॅनल प्रमुख)
महिला राखीव प्रतिनिधी
(१) कुऱ्हाडे सविता नितीन
(२) वामन सुनिता राजु
भटक्या विमुक्त जाती / जमाती प्रवर्ग-
(१) घोडे दत्तात्रय उमाजी
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ पुरस्कृत ' शिक्षक संघ पॅनलला ' जुन्नर तालुका एकल शिक्षक मंच,जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक भारती या संघटनांनी जाहीर पाठींबा दिलेला होता. यावेळी सभासदांनी दर्शविलेल्या विश्वासाबद्दल पतसंस्थेचे सभापती संदीप थोरात यांनी सभासदांचे आभार व्यक्त केले.
“ निवडणूक जाहीरनाम्यास अनुसरून सभासद हित व पतसंस्थेच्या उन्नतीस कटीबद्ध राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे व राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर यांनी यावेळी दिली."
यावेळी राज्य संघ उपाध्यक्ष विनायक ढोले,राज्य संघ प्रतिनिधी विलास रावते, जिल्हा संघ महिला आघाडी अध्यक्षा सुशिला डुंबरे,तालुका संघाचे नेते सदू मुंढे, सरचिटणीस संतोष पानसरे, कार्याध्यक्ष सयाजी चिखले, कोषाध्यक्ष शरद वारुळे, प्रवक्ता अन्वर सय्यद, प्रसिद्धी प्रमुख दिनेश मेहेर, संपर्कप्रमुख समीर कुमकर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्वप्नजा मोरे, एकल संघटनेचे अध्यक्ष सुरेश देठे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर दिघे,शिक्षक भारतीचे संतोष औटी,पतसंस्थेच्या उपसभापती आशा धांबोरी, विद्यमान संचालक मंडळ, व संघ शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिला सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती.
COMMENTS