क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ पॉलिटेक्निक , बेल्हे (बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील नेहा दर...
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट
संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) या तंत्रनिकेतन
महाविद्यालयातील नेहा दरेकर आणि निकिता दरेकर यांनी मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट
कामगिरी करत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर (पिंपरी) येथे आंतर
विभागीय (W4) मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये समर्थ
पॉलिटेक्निक, बेल्हे(बांगरवाडी)
या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील नेहा दरेकर हिने २०० मीटर धावणे,१००
मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.तर निकिता
दरेकर हिने ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
सदर विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक किरण वाघ, डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.
संजय कंधारे, प्रा.अक्षय
सूनसुळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव
विवेक शेळके, विश्वस्त
वल्लभ शेळके यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.
COMMENTS