उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱयांना जेरबंद केले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोल...
उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱयांना जेरबंद केले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
उमरगा पोलिसांचे पथक हे गस्तीस असताना गोपनीय माहितीच्या आधारे उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकाने 31 ऑक्टोबर रोजी 16.00 वा.सु. उमरगा शहरातील गंधर्व हॉटेलसमोरच्या हिदुस्तान पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राच्या आवारात बेवारस असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 13 एएक्स 3716 ची तपासणी केली. यावेळी ट्रकच्या हौद्यात टारपोलीन खाली झाकलेली 35 पोती माल दिसला. पथकाने खात्री केली असता त्या पोत्यांत असणाऱ्या छोट्या पिशव्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकtण 23,10,000 रुपये किंमतीचा माल आढळला. पोलिसांनी थोडा वेळ बाजूला थांबून ट्रकचा ताबा घेण्यास कोणी व्यक्ती येते का ? याची चाचपणी केली. परंतु, कोणीही ट्रककडे न आल्याने नमूद मालासह ट्रक असा एकुण 28,10,000 ₹ माल जप्त करुन पोलिस ठाण्यात नेला.
अधिक तपासाअंती त्या ट्रकचा चालक अजीम करीसाब शेख (रा. हमीदनगर, उमरगा) हा असल्याचे समजले. जप्त मालाची तपासणी होण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास कळवले असता नसरीन तनवीर मुजावर यांनी जप्त पदार्थ हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी श्रीमती मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (iv), 27 (3) (e) सह वाचन अधिनियमांतर्गत 490/2022 हा गुन्हा उमरगा पो.ठा. येथे 01 नोव्हेंबर रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे पोलिस उप अधीक्षक रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पो.ठा. चे पोनि. मनोज राठोड, सपोनि. कवडे, पोलिस अंमलदार. अतुल जाधव, घोळसगावकर, पठाण, दिवे, मेटे यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि क्षिरसागर हे करीत आहेत.
COMMENTS