पु णेः कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याकडून 41 गुन्हे उघड करण्यात युनिट 4 ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत...
पुणेः कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी
करणाऱ्या चोरट्याकडून 41 गुन्हे उघड
करण्यात युनिट 4
ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास
पोलिस करत आहेत.
मागील काही
दिवसांपासून पुणे शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप व इतर साहित्य
चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.
सदर चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कारवाई
करण्याबाबतचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्या अनुषंगाने 22/10/2022 रोजी युनिट 4 चे पथकासह चतु:र्श्रुंगी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंध
पेट्रोलींग करत होते. पोलिस अंमलदार सारस साळवी व अजय गायकवाड यांना गोपनीय बातमी
मिळाली की, कारच्या काचा फोडून चोरी करणारा एक जण
हा चतु:शृंगी मंदिराचे जवळ असणारे गणेश मंदिराजवळ उभा आहे.
सदर मिळाले
बातमीचे ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून एका संशयितास ताब्यात घेतले. आकाश उर्फ
विकास धरमपाल ठाकूर (वय 34 वर्षे
सध्या रा. बालेवाडी गाव, मारुती
मंदिराजवळ, पुणे. मूळ रा. सच्चाखेडा गाव, तालुका नरवाणा, जिल्हा
जिंद, राज्य हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे.
त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तो व त्याचा एक साथीदार असे मिळून
पार्किंग केलेल्या कारच्या काचा फोडून त्यामधून लॅपटॉप बॅग व इतर साहित्य चोरी
केल्याची कबुली दिली. त्याच्या कडे केलेल्या तपासात त्याने पुणे शहर व पिंपरी
चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून एकूण 41 ठिकाणी
चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील माल पुणे व हरियाणा येथे ठेवल्याचे सांगितले.
वरिष्ठांचे
परवानगीने युनिट 4
कडील पीएसआय जयदीप पाटील, पोलिस हवालदार अजय गायकवाड, पोलिस नाईक
सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ असे पथक हरियाणा येथे
तपासाकरीता पाठविले असता आरोपीने केलेल्या निवेदना प्रमाणे एकूण 16 लॅपटॉप व 1 एँक्टिवा
मोटरसायकल असा एकूण 8,35,000/- रु. चा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे. त्याच्याकडून
उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे :-
1) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
443/22 भादवि क. 379,427
2) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
358/22 भादवि क. 379,427
3) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
442/22 भादवि क. 379,427
4) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
119/21 भादवि क. 379,427
5) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
445/22 भादवि क. 379,427
6) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
1415/20 भादवि क. 379,427
7) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
400/22 भादवि क. 379,427
8) चतु:शृंगी पोलिस ठाणे- गुरनं.
367/22 भादवि क. 379,427
9) कोथरूड पोलिस ठाणे- गुरनं.
2125/20 भादवि क. 379,427
10) अलंकार पोलिस ठाणे- गुरनं.
22/20 भादवि क. 379,427
11) भारतीविद्यापीठ पोलिस ठाणे- गुरनं.
567/22 भादवि क. 379,427
12) सहकार नगर पोलिस ठाणे- गुरनं.
66/22 भादवि क. 379,427
13) सहकार नगर पोलिस ठाणे- गुरनं.
223/22 भादवि क. 379,427
14) सहकार नगर पोलिस ठाणे- गुरनं.
119/22 भादवि क. 379,427
15) खडक पोलिस ठाणे- गुरनं. 226/22
भादवि क. 379,427
16) येरवडा पोलिस ठाणे- गुरनं.
454/22 भादवि क. 379,427
17) बंडगार्डन पोलिस ठाणे- गुरनं.
264/22 भादवि क. 379,427
18) बंडगार्डन पोलिस ठाणे- गुरनं.
204/22 भादवि क. 379,427
19) बंडगार्डन चतु:शृंगी पोलिस ठाणे-
गुरनं. 459/20 भादवि क.
379,427
20) कोरेगाव पार्क पोलिस ठाणे- गुरनं.
20/22 भादवि क. 379,427
21) कोरेगाव पार्क पोलिस ठाणे- गुरनं.
290/20 भादवि क. 379,427
22) कोरेगाव पार्क पोलिस ठाणे- गुरनं.
68/22 भादवि क. 379,427
23) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
72/22 भादवि क. 379,427
24) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
395/22 भादवि क. 379,427
25) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
69/21 भादवि क. 379,427
26) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
388/22 भादवि क. 379,427
27) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
59/22 भादवि क. 379,427
28) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
381/22 भादवि क. 379,427
29) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
109/22 भादवि क. 379,427
30) विमानतळ पोलिस ठाणे- गुरनं.
118/22 भादवि क. 379,427
31) चंदननगर पोलिस ठाणे- गुरनं.
1222/20 भादवि क. 379,427
32) चंदननगर पोलिस ठाणे- गुरनं.
261/22 भादवि क. 379,427
33) चंदननगर पोलिस ठाणे- गुरनं.
58/22 भादवि क. 379,427
34) डेक्कन पोलिस ठाणे- गुरनं.
685/20 भादवि क. 379,427
35) डेक्कन पोलिस ठाणे- गुरनं.
686/20 भादवि क. 379,427
36) डेक्कन पोलिस ठाणे- गुरनं.
138/22 भादवि क. 379,427
37) शिवाजीनगर पोलिस ठाणे- गुरनं.
26/22 भादवि क. 379,427
38) लष्कर पोलिस ठाणे- गुरनं. 98/21
भादवि क. 379,427
39) लष्कर पोलिस ठाणे- गुरनं.
102/22 भादवि क. 379,427
40) हिंजवडी पोलिस ठाणे- गुरनं.
914/22 भादवि क. 379,427
41) वाकड पोलिस ठाणे- गुरनं. 870/22
भादवि क. 379,427
सदरची
कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह
आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस
आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप
आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा.पोलिस
आयुक्त गुन्हे 2
नारायण शिरगावकर यांचे
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सपोनि
विकास जाधव, पो.उप नि. जयदीप पाटील व युनिट क्र. 4 कडील अंमलदार यांनी केली आहे.
COMMENTS