आष्टी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाहिरा येथील मुक्ताबाई दगडू मेटे यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता निधन झाले. त्या 90 ...
आष्टी (प्रतिनिधी) :
तालुक्यातील वाहिरा येथील मुक्ताबाई दगडू मेटे यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलं, एक मुलगी नातू , पणतू असा मोठा नातेवाईक परिवार आहे. त्या शांत व सुस्वभावी होत्या. तसेच अत्यंत कष्टाळू आणि दूरदृष्टीच्या असल्याने त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाबाळांचे उत्तम संगोपन केले. त्यांच्या जाण्याने वाहिरा पंचक्रोशीत शोककळा पसरली.
ह.भ.प. सोमनाथ मेटे महाराज व संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांच्या आजी होत.
मुक्ताबाई दगडू मेटे यांच्यावर सोमवारी ( दि. 21) सकाळी 8 वाजता वाहिरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ मेटे महाराज यांनी दिली.
COMMENTS