आरोग्य टिप्स - अनेकांना उच्च रक्तदाबाची ( high blood pressure) समस्या असते. मात्र आहारात काही बदल केले तसेच ठराविक अन्नपदार्थांचा आहारात स...
आरोग्य टिप्स - अनेकांना उच्च रक्तदाबाची
( high blood pressure) समस्या
असते. मात्र आहारात काही बदल केले तसेच ठराविक अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला
तर उच्च रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. जाणून घ्या उच्च रक्तदाब नियंत्रणात
आणण्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचे सेवन करावे –
केळ पोटॅशियमचे एक समृद्ध स्त्रोत आहे. त्यातील खनिजे रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभरात एक तरी केळ खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
ओट्स (Oats)
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक तर फॅट्स कमी प्रमाणात असतात. ही पोषकतत्त्वे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी आहेत.
हिरव्या पालेभाज्या ( green vegetables)
आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या शरीरातील अतिरिक्त सोडिअमचे प्रमाण कमी करते.
दही (Yogurt)
दह्यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असते. तसेच दही रक्तदाबाची पातळी नियंत्रणात आणण्याचं काम करतं.
COMMENTS