पुणे : पुण्यातील दोन महिला पोलिस एका बाळाला सांभाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ हडपसर येथील एका परीक्षाके...
पुणे : पुण्यातील दोन महिला पोलिस एका बाळाला सांभाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ हडपसर येथील एका परीक्षाकेंद्रावरील असून, पुणे महिला पोलिसांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.
पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. बुधवारी दुपारी विधी अधिकारीपदासाठी रामटेकडी इथल्या एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला अनेक विवाहित महिलासुद्धा परीक्षेसाठी बसल्या होत्या. तसेच काही गरोदर महिलांसोबत काही महिला लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या. यावेळी अनेक महिलांचे नातेवाईक सुद्धा सोबत आले होते.
हडपसर परिसरात असणाऱ्या रामटेकडी परिसरातल्या परीक्षा केंद्रावर एका चार महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
COMMENTS