सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दाऱ्याघाट पर्यटन क्षेत्र म्ह...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दाऱ्याघाट पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे आंबोली येथे शाळेतील सर्व मुले व शिक्षकवृंद गेले असता जून महिना सुरू झाला की लाखो पर्यटक दाऱ्याघाटात वर्षाविहारासाठी व निसर्ग सौंदर्य पाहण्याकरीता येत असतात आणि हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांना नवल वाटते कारण शाळेजवळूनच हे सर्व पर्यटक जात असतात आणि म्हणूनच याचे औचित्य साधून आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल व भिवाडे येथील सर्व मुलांना दाऱ्याघाटातील धबधबे सुंदर मनमोहक निसर्ग सौंदर्य वातावरण व वनभोजन आणि परिसर भेट तसेच यानिमित्ताने परिसरातील औषधी वनस्पती यांचा परिचय व माहिती आणि दार्याघाटाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना श्री सुभाष मोहरे यांनी सांगितले.
या परिसर सहलीच्या निमित्ताने सर्व मुलांना त्यांच्या आवडीचा मेनू व सर्व नियोजन आणि खर्च ज्यांना नुकताच पुणे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले श्री.अन्वर सय्यद सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल यांचाही परिसरातील सुंदर रानफुले देऊन भिवाडे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कडू व सर्व उपस्थित सहकारी यांनी केले तर मुलांसह शिक्षकांस उत्कृष्ट व स्वादिष्ट भोजनाचे व इतर नियोजन सत्कारमूर्ती श्री. अन्वर सय्यद यांनी केले. सर्व मुलांनी कबड्डी गाण्यांच्या भेंड्या व इतर मौजमज्जा करून सहलीचा खूप आनंद लुटला जेवणाचे सुरेख नियोजन सौ आरती मोहरे सौ. लिलावती नांगरे व सौ. स्मिता ढोबळे आणि सौ. सिमा लोखंडे यांनी पाहिले. तर सहलीसाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निलेश नवले व आदी पालक उपस्थित होते.
COMMENTS