डिसेंट फाउंडेशन चा शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम. सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : डिसेंट फाउंडेशन च्या वतीने ...
डिसेंट फाउंडेशन चा शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम.
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : डिसेंट फाउंडेशन च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका या प्रसंगावर आधारित शिवप्रताप /गरुडझेप हा सिनेमा मोफत दाखवण्यात आला.
छत्रपती शिवरायांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भूमिकेने सर्व मुले भारावून गेली होती.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव, अलदरे, दातखिळेवाडी , आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह जुन्नर व गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यानी या चित्रपटाचा आनंद घेतला.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आम्ही पुस्तकात फक्त वाचलं व ऐकलं होतं परंतु आज प्रत्यक्ष राजांचा पराक्रम पाहताना आम्ही भारावून गेलो.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, प्रकल्प समन्वयक एफ.बी. आतार सर, विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश वाजे , सावित्रीबाई फुले वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नंदाताई मंडलिक, दातखिळे वाडीचे लोकनियुक्त सरपंच राहुल दातखिळे, लेण्याद्री इंटरनॅशनल हॉटेलचे मालक संदीप ताजणे, श्री फ्लेक्स चे मालक सतीश लोखंडे, अलदरे सोसायटीचे चेअरमन संतोष सरजिने, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बेडवई, पल्लवीताई वाणी, प्रगतिशील शेतकरी गणेश मेहेर, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी काशिनाथ देवकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पानसरे, शालेय व्यवस्थापन समिती अलदरे यांनी सहकार्य केले.
COMMENTS