विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील आयक्यूएसी अंतर्गत, वनस्पतीशास्त्र विभाग आणि वनविभ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील आयक्यूएसी अंतर्गत, वनस्पतीशास्त्र विभाग आणि वनविभाग, जुन्नर यांच्या सहकार्याने व संयुक्त विद्यमाने दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये "वन्यजीव सप्ताह" साजरा करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने "निसर्ग सानिध्यात स्थानिक, देशी जातीच्या सदाहरित झाडांची रोप निर्मिती" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या उपक्रमामध्ये वनस्पतीशास्त्र विषयाच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या परिसरातील जंगल विस्तारामध्ये स्थानिक देशी प्रजातींचे वनसंवर्धनामध्ये असणारे स्थान व महत्व पटवून देण्यासाठी, तसेच भविष्यात जंगलांचा विस्तार होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जावा हा उद्देश समोर ठेऊन सदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी दुर्गवाडी परिसराच्या जंगलामध्ये वाढणाऱ्या स्थानिक, सदाहरित झाडांची, त्यामध्ये प्रामुख्याने अंजन, पीसा, जांबुटी, माकड लिंबू अशा देशी जातीच्या वनस्पतींची रोपे जंगलामधील या झाडांच्या सावलीत वाढणाऱ्या परिसरातून संकलित केली, आणि जंगलातील मातीचा उपयोग करून त्या रोपांचे प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये प्रत्यारोपण केले.
विद्यार्थ्यांनी अडीच हजारांहून जास्त रोपांची निर्मिती केली. या सर्व रोपांच्या पिशव्या गाडीमध्ये लोड करून जुन्नर वनविभागाच्या नर्सरीमध्ये संगोपन करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. तसेच जवळपास अडीच ते तीन हजार रोपे, वनविभागाच्या नर्सरीमधील भरलेल्या मातीच्या पिशव्यांमध्ये लावण्यासाठी दिली. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. संजय शिवाजीराव काळे व सर्व पदाधिकारी, मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, प्रभारी प्रबंधक सौ. एम. डी. कोरे तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. अजित शिंदे, आणि त्यांचे सहकारी श्री. विरणक, श्री. बेल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एच. लोखंडे व त्यांचे सहकारी प्रा. एस. पी. डोके, प्रा. आर. बी. उत्तरडे आणि कर्मचारी श्री. चौधरी, कु. साळुंके तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले आणि मोलाचे योगदान दिले.
COMMENTS