सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : संकल्प अन्नपूर्णा केंद्र,राजुरी येथे सालाबाद प्रमाणे दिपावली पाडवा निमित्त गरीब व गर...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : संकल्प अन्नपूर्णा केंद्र,राजुरी येथे सालाबाद प्रमाणे दिपावली पाडवा निमित्त गरीब व गरजुंना फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या वर्षी समर्थ शैक्षणिक संकुला तर्फे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वा युवा नेते वल्लभ शेळके सर, सरपंच प्रियाताई हाडवळे, सोसायटीचे चेअरमन कारभारी दादा औटी, व्हा चेअरमन अविनाश पाटील औटी, ग्रा.पं सदस्य शाकिरभाई चौगुले, रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर, ह.भ.प.विशाल महाराज हाडवळे, सोसायटी संचालक दस्तगिरभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते निलेश शेठ हाडवळे, कारभारीदादा गंधट, सुदाम शेठ हाडवळे, गणेश शेठ हाडवळे, विवेक शेळके, रामदास औटी, डी के औटी, साईनाथ हाडवळे, गोरक्ष हाडवळे, प्रदिप गाडेकर, संकल्पचे विश्वस्त आरिफ पटेल, वसीम पटेल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा नेते वल्लभ शेळके सर यांनी संकल्प अन्नपूर्णा केंद्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य प्रवर्तक हाजी गुलाम नबी शेख व संकल्पचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून सर्व नागरिकांना दिपावली व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेचे उपाध्यक्ष जिलानी पटेल यांनी समर्थ शैक्षणिक संकुल व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS