सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उप कार्यालय नारायणगाव येथील सेंट्रल...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी
पतसंस्थेचे उप कार्यालय नारायणगाव येथील सेंट्रल प्लाझा इमारतीत दस-याच्या शुभ
मुहुर्तावर सुरु करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके, जि.प.सदस्या
आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य
विकासभाऊ दरेकर, विघ्नहर
साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पं.स.सदस्या अर्चनाताई माळवदकर,
सरपंच
योगेशभाऊ पाटे, जंगलभाऊ
कोल्हे, आशिष
माळवदकर, संतोष पाटे यांच्यासह संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, पतसंस्थेचे
सर्व आजी माजी संचालक, तालुक्यातील
आजी माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक पतसंस्थेचे हे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे.सभासदांच्या
मागणीवरुन हे उपकार्यालय नारायणगाव या मध्यवर्ती शहरात सुरु होत असल्याने
सभासदांनी आनंद व्यक्त केला. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल १७० कोटी रुपये असल्याचे सभापती संदिप थोरात यांनी
सांगितले. कार्यालयासाठी लागणारे संपूर्ण फर्निचर ओम श्री साईराम शिक्षक
प्रतिष्ठाण नारायणगावच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात आले. त्याबद्दल
प्रतिष्ठाणच्या सर्व दानशूर सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, सल्लागार
संजय डुंबरे, जिल्हा
सरचिटणीस खंडेराव ढोबळे, तालुका
अध्यक्ष विकास मटाले, महिला
आघाडी प्रमुख स्वनजा मोरे आदी पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे सभासद
सयाजी चिखले यांना दहा लाखांचा धनादेश मान्यवरांचे हस्ते देऊन कार्यालयाची सुरुवात
करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन मुळे, रविंद्र वाजगे यांनी केले तर आभार शरद
शिंदे यांनी मानले.
COMMENTS