न वी दिल्ली: हरियाणातील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका युवतीचा (वय २५) खून झाल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला होता. या प्रकरणाचा ख...
नवी दिल्ली: हरियाणातील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका युवतीचा
(वय २५) खून झाल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला होता. या प्रकरणाचा खुलासा झाला
असून, आरोपीला अटक झाली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने
या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. याप्रकरणी तिच्या नवऱयाला अटक करण्यात आली
आहे. सोमवारी गुरुग्राममधील अतिशय गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या इफको
चौकाच्या कडेला एक बेवारस सुटकेस आढळून आली होती. एका ऑटोरिक्षा चालकाने
सुटकेसबाबत पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी बॅग उघडल्यानंतर एका महिलेचा
मृतदेह आढळून आला होता. शिवाय, महिलेच्या
अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि शरीरावर असंख्य वार करण्यात आले होते. धक्कादायक
म्हणजे आरोपीने मृत महिलेच्या हातावरील टॅटू मिटवण्यासाठी चाकूने खूप वार केले
होते. शिवाय, टॅटूचा भाग जाळण्याचाही प्रयत्न केला
होता. मृतदेहासोबत कोणताही पुरावा राहणार नाही याची त्याने काळजी घेतली होती.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
पोलिसांनी
सूटकेस आढळून आली त्या ठिकाणी असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासण्यास
सुरुवात केली. यात एक व्यक्ती सूटकेस घेऊन याच परिसरात घुटमळत असल्याचे
पोलिसांच्या निदर्शनास आले. दिवसाढवळ्या जड सूटकेस रस्त्यावरुन ओढत ओढत त्याने
चौकात टाकली आणि तिथून तो निघून गेला. पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने
आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.
COMMENTS