सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे शा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे शारदीय नवरात्रौत्सव व खंडेनवमीनिमित्त यंत्र पूजन करण्यात आले.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन, सरस्वती पूजन व यंत्र पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत, डॉ.शिरीषनाना गवळी, बी सी एसचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप, डॉ.उत्तम शेलार, समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली ताई आहेर, गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, प्रा.संजय कंधारे, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय परंपरेनुसार नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला शस्र पूजन व यंत्र पूजन केले जाते.समर्थ संकुलात प्रतिवर्षीप्रमाणे कार्यशाळा,प्रयोगशाळा,ट्रेनिंग सेंटर आदींमध्ये असणाऱ्या विविध साधन सामग्री, उपकरणे, औजारे पूजन आज करण्यात आले.
यावर्षी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी विविध उपयुक्त वस्तूची निर्मिती केली होती. त्या वस्तूंचे प्रदर्शन या निमित्ताने भरवण्यात आले होते. त्याचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रदर्शनाला संकुलातील विविध विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समर्थ संकुलात तांत्रिक शिक्षण व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने यंत्र, औजारे, प्रयोगशाळेतील साहित्य, उपकरणे यांच्याशी विद्यार्थ्यांचा नेहमीच संपर्क येत असतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत त्या सर्वच क्षेत्रामध्ये ही यंत्र, अवजारे, साहित्य त्यांच्या सोबत असणार आहेत. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे शस्त्रपूजन मोठ्या प्रमाणात व्हायचे त्याप्रमाणेच आजही आधुनिक काळात या यंत्रांचे पूजन करून त्या जोरावर कौशल्ये अधिकाधिक आत्मसात करून उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
सर्व उपस्थित शिक्षकांनी व मान्यवरांनी यावेळी संकुलातील प्रयोगशाळा साहित्य उपकरणे, यंत्र, अवजारे यांची पूजा केली.
आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे म्हणाले की, यंत्र ही साधना असून यंत्राचे तंत्र लक्षात घेऊन फक्त आजच्याच दिवशी नाही तर वेळोवेळी या यंत्रांकडे लक्ष देऊन त्याची निगा राखली तर यंत्राचे तंत्र आपल्याला जीवनात एक नवीन मंत्र देऊन जीवन अधिक सुसह्य करण्यात मदत करतील.
कार्यक्रमाचे नियोजन आय टी आय विभागाचे सर्व निदेशक, विद्यार्थी तसेच क्रीडा संचालक डॉ.राजाभाऊ ढोबळे, ज्ञानेश्वर जाधव यांनी केले प्रा.प्रदीप गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS