सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षातील बदलांना सामोरे जावे:प्रा दिनेश ताठे द युनिक अकॅडे...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षातील बदलांना सामोरे जावे:प्रा दिनेश ताठे
द युनिक अकॅडेमी पुणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास केंद्र आणि समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
द युनिक अकॅडमी, पुणे च्या वतीने प्रा.दिनेश ताठे व प्रा.मयुरी सावंत हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सध्याचे युग हे स्पर्धेचं असून बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात.परंतु त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत पुरेशी माहिती नसते व त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये होणाऱ्या बदलांना सामोरे जावे. एम पी एस सी, यू पी एस सी बँकिंग स्टाफ सिलेक्शन परीक्षेत नवीन बदल झालेले असून या नवीन बदलांना कसे सामोरे जावे याबाबत प्रा.ताठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंजिनिअरिंग तसेच फार्मसी नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये असणाऱ्या अनेकविध करियर च्या संधीची माहिती यावेळी देण्यात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी कशी करावी व वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी याबाबत प्रा.ताठे यांनी मागर्दशन केले. यावेळी स्पर्धा परीक्षेशी संबधीत पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. समर्थ संकुलातील विद्यार्थ्यांना विशेष सवलतीच्या दरात पुस्तक विक्री करण्यात आली.
प्रा.मयुरी सावंत यांनी एस एस सी बँकिंग क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधीबाबत विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधला. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा,परीक्षाचे स्वरूप, पूर्वतयारी याबाबत सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इंजिनिअरिंग, फार्मसी, बीबीए, बी कॉम, बी सी एस या विभागातून १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय कार्यशाळेस आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, प्रा.राजीव सावंत, बी सी एसचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप,फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, डॉ.संतोष घुले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अनिल कपिले, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटिल, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या एकदिवसीय कार्यशाळेचे नियोजन करण्यासाठी अभियांत्रिकीचे ग्रंथपाल प्रा.गणेश नवले, बी सी एस चे ग्रंथपाल प्रा.सारिका मावळे, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे ग्रंथपाल प्रा.चंद्रसेन गडकरी,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे ग्रंथपाल प्रा.सुजाता आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS