सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : प्रसिद्ध वक्ते, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळाचे ग...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : प्रसिद्ध वक्ते, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक यांना
निर्वाण फौंडेशन, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा "सावित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान" पश्चिम आफ्रिका स्कॉलर गॅब्रिअल लोपेस, सामाजिक कार्यकर्ता किटॅनो अर्बीस्ता, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, सिने अभिनेता प्रशांत गरुड, सिने अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, अध्यक्ष निलेश आंबेडकर यांच्या हस्ते प्राप्त झाला.
रतिलाल बाबेल यांनी विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने शिक्षकांसाठी शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन यासारखे उपक्रम राबविले असून पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात ते सक्रिय सहभागी असतात.
ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात गेली तीस वर्षे ते विज्ञान व गणित अध्यापनाचे कार्य करीत असून उत्तम निकालाची परंपरा त्यांनी कायम राखली आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत. शिक्षकांसाठी असणाऱ्या वरिष्ठ श्रेणीसाठी व नवीन अभ्यासक्रमासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. आदिवासी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाबरोबर त्यांनी मोफत मार्गदर्शन केले आहे. पुणे जिल्ह्यात त्यांचा उत्कृष्ट वक्ते म्हणून नावलौकिक आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन निर्वाण फाउंडेशन नासिक यांच्या वतीने सावित्रीज्योती हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
रतिलाल बाबेल यांचा समावेश ही जुन्नर तालुक्यातील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे.
आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची शासन व विविध संस्थांनी दखल घेतल्या असून त्यांना राष्ट्रीय, राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील दीडशेपेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या निवडीबद्दल ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहर, उपाध्यक्ष सुजित भाऊ खैरे, सर्व संचालक, जुन्नर तालुका विज्ञान व गणित शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट धोलवडचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जे.सी. कटारिया, ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष संघटक सौ. माया कटारिया, बाबेल ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय रामचंदजी बाबेल ट्रस्ट धोलवड ची स्थापना केली असून या ट्रस्ट मार्फत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करीत आहेत. समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्ञान प्रेरणा, समाज प्रेरणा, दुर्ग प्रेरणा, संस्कार प्रेरणा अशा अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहेत.वाचन चळवळ ग्रामीण भागात वाढावी यासाठी गेली वीस वर्षापासून ते प्रयत्न करीत आहेत. आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शना बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी प्रसिद्ध जादूगारांचे वैज्ञानिक प्रयोग मोफत दाखवत आहेत.
COMMENTS