ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांत दमदार पावसामुळे राळेगण आंबेराई मळ...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांत दमदार पावसामुळे राळेगण आंबेराई मळा येथील बाह्यवळणाच्या रस्त्याचा कडेचा भाग पूर्णपणे खचला असून संबंधित सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
बेलसर ते भिवाडे या दरम्यानचा रस्ता हा पूर्णपणे अति पावसामुळे खराब झाला असून या रस्त्यावरून चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या संपूर्ण रस्त्याच्या कडेची गटारे पूर्णपणे गाडली गेल्याने आजूबाजूचे पाणी हे रस्त्यावर साचल्याने रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अपघातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भागातील बेलसर, बोतार्डे, राळेगण, शिंदे, सोनावळे, घंगाळदरे, इंगळूण, भिवाडे या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात बाभळी तसेच इतरही झाडांची वाढ झाल्याने या झाडांच्या फांद्या रस्त्याच्या आसपास येत आहेत, त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसण्यास वाहनचालकांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.
राळेगण आंबेराई येथील संबंधित रस्त्याचा खचलेला भाग सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने तात्काळ दुरूस्त करावा जेणेकरून अपघात होणार नाहीत, खरं तर हा बाह्यवळणाच्या बाजूचा भाग अरूंद असून मोठ्या वाहनांना जाताना कसरत करावी लागत आहे हा रस्त्याचा भाग तुटल्याने वाहनचालकांना या बाजूचा अंदाज येण्यासाठी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांनी काठीला सफेद कपडा बांधला आहे.
खरं तर मागील काही दिवस पावसाचे असताना सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, मात्र आता तरी या भागातील रस्त्यांची कामे संबंधित ठेकेदारांनी लक्ष देऊन व्यवस्थितरित्या करावी, जेणेकरून वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास कमी होईल. तसे रस्त्याच्या साईटची गटारे उकरली नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले जाऊन रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत याकडे वेळीच लक्ष देऊन रस्ता चांगला करण्याची मागणी या भागातील नागरिक व वाहनचालक करत आहेत.
COMMENTS